![]()
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत पैशांची मागणी केली. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात किशोर विलास साळुंके (20), कृष्णा अवचितराव सोळुंके (25, दोघेही चिमणापूर, ता. कन्नड) यांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली. पीडित मुलीच्या नातेवाईक महिलेला एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. “तुमच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो माझ्याकडे असून, वीस हजार रुपये न दिल्यास ते व्हायरल करू,’ अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली. कपडे उलटे असल्याने खात्री सकाळी शुद्ध आल्यावर ती जालना रोडवर होती. त्या मधल्या काळात काय झाले यातील तिला काही आठवत नव्हते. तिने आरोपीला फोन करून विचारले, मात्र त्याने सर्व आलबेल असल्याप्रमाणे उत्तर देत घरी सोडल्याचे सांगितले. पीडित मुलगी घरी गेल्यावर तिच्या अंगावर असलेले सर्व कपडे उलटे घातलेले होते, तिला वेदना होत असल्याने तिला चुकीचे घडल्याची खात्री झाली. गुंगीचे औषध देऊन अत्याचार अल्पवयीन मुलीची एका तरुणाशी ओळख झाली होती. त्या तरुणाने त्याचा मित्र किशोर सोळुंके याचा मोबाइल नंबर पीडितेला दिला. त्यानंतर किशोर आणि पीडितेची ओळख झाली. 1 जून रोजी रात्री किशोरने त्याच्या मित्राच्या मोबाइलवरून पीडितेला फोन करून टीव्ही सेंटरला भेटायला बोलावले. तेथून त्याने तिला खोलीवर नेले. तेथे पीडितेने नकार दिला असतानाही तिला जबरदस्तीने गुंगीचे औषध पाजले. पीडिता बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर अत्याचार केले.
Source link
संभाजीनगरात अल्पवयीन मुलीशी मैत्री करत अत्याचार:आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकीही, आरोपी वेटर काम करणारे, दोन दिवसांची पोलिस कोठडी