Headlines

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray on Operation Tiger; Second Marriage Taunt


“देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात, म्हणूनच कोणताही निवडणूक काळ नसताना शिंदे गटात फोडाफोडी झाली. हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे,” असा खळबळजनक आरोप शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न

.

“आमचा 2019 लाच प्रेमभंग झाला असून, आता आम्ही दुसरं लग्न करून सुखाचा संसार थाटला आहे,” असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानातील हवाच काढून घेतली.

‘ऑपरेशन टायगर’वर काय म्हणाले फडणवीस

ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या घटनेवर बोलताना फडणवीस म्हणाले, “आमच्या मित्रपक्षाने (शिंदे गटाने) हे ऑपरेशन केले आहे. राजकारणात जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा त्याचे सर्व तपशील जाहीर करायचे नसतात. मित्रपक्षाला आमचा योग्य तो पाठिंबा होता, त्यांना आवश्यक ती मदत आम्ही नक्कीच केली. पण याव्यतिरिक्त जास्त काही सांगणे हे सूज्ञ राजकारणाचे लक्षण नाही.”

भविष्य असुरक्षित वाटल्यावर लोक पक्ष सोडतात

ठाकरे गटात सुरू असलेल्या गळतीवर भाष्य करताना त्यांनी नेत्याच्या आत्मविश्वासाचा मुद्दा मांडला. “राजकारणात प्रत्येक जण आपले भविष्य पाहत असतो. ज्या नेतृत्वासोबत आपण काम करतोय, तिथे आपले भविष्य सुरक्षित नाही असे जेव्हा वाटू लागते, तेव्हा जिथे भविष्य दिसते तिथे लोक जातात. आम्ही अडीच वर्षे विरोधात होतो, पण आमचा एकही माणूस फुटला नाही. कारण आम्ही एकही दिवस सरकारला शांत झोपू दिले नाही. आमच्या नेत्यांवर (गोपीनाथ मुंडे साहेबांवर) आमचा असाच विश्वास असायचा. जेव्हा नेता असा आत्मविश्वास वाढवू शकत नाही, तेव्हा पक्ष संपतात,” असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरेंना काढला.

मित्र पक्षाचे ऑपरेशन मी का थांबवू?

“उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकून माझेही मनोरंजन झाले,” असे सांगत फडणवीस म्हणाले, “समजा, माझा मित्रपक्ष एखादे ऑपरेशन करत असेल, तर मी ते का थांबवावे? आमच्यात असे काय प्रेम उरले आहे की, जे दिवसरात्र माझ्यासोबत आहेत त्यांना थांबवून, ज्यांनी मला नेमक्या वेळी सोडले (उद्धव ठाकरे) त्यांच्या मदतीला मी का जावे? माझ्या राजकीय अस्तित्त्वाचा प्रश्नच उद्भवत नाही, ते कसे टिकवायचे हे मला चांगले माहीत आहे. एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये योग्य संवाद आहे, त्यामुळे अशा वावड्या उठल्याने आमच्या नात्यात काहीही फरक पडत नाही.”

आता आमचा सुखाचा संसार सुरू आहे!

उद्धव ठाकरे यांनी ‘देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात’ असा उल्लेख केला होता. या ‘प्रेमा’वर मिश्किल भाष्य करताना फडणवीसांनी थेट एका हिंदी गाण्याचा दाखला दिला. “माना के तेरे जहां में ये नहीं के प्यार नहीं मिलता, वो जब चाहिये तब नहीं मिलता…” या ओळी ऐकवत ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंचे हे सगळे प्रेम मला 2019 मध्ये हवे होते. तेव्हाच आमचा प्रेमभंग झाला. प्रेमभंगानंतर आता आम्ही दुसरं लग्न केलंय (शिंदे गट आणि राष्ट्रवादीसोबत), आमचा सुखाचा संसार थाटला आहे, लग्नाचे वाढदिवसही झाले… आता काय राहिलं?” असे उत्तर देत त्यांनी सर्व राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आता भक्कम होत आहे. जे लोक तिकडे उरले होते, त्यांनाही आता वाटू लागले आहे की, बाळासाहेबांची मूळ शिवसेना आता एकनाथ शिंदेंचीच शिवसेना आहे,” असेही फडणवीस शेवटी म्हणाले.

संबंधित बातमी वाचा..

आमचा खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका:तो भाऊसाहेब नव्हे, ‘खाऊसाहेब’; शिर्डीत उद्धव ठाकरेंचा वाकचौरेंवर कडाडून हल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये झंझावाती दौरे करत आहेत. या मोहिमेत आज त्यांनी शिर्डीचे आराध्य दैवत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि त्यानंतर आयोजित जाहीर सभेतून शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडले. “काहींच्या नसानसात आणि रक्तातच गद्दारी भिनलेली असते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. हा भाऊसाहेब नव्हे, तर ‘खाऊसाहेब’ वाकचौरे आहे. जिथे जाईल तिथे फक्त ‘खाऊ’ खायचा, हाच यांचा एककलमी कार्यक्रम आहे,” अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.