Headlines

FDA will register a case against the organizers if Mahaprasad is distributed without a license



श्रावण महिन्यात शहर व परिसरात मंदिरे, सार्वजनिक मंडळे आणि भाविकांकडून ठिकठिकाणी महाप्रसाद व मोफत अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो. मात्र, अस्वच्छतेमुळे अन्नातून विषबाधेचे प्रकार घडू नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. भावि

.

थेट कारवाई : नियम मोडल्यास काय होईल? : विनापरवाना महाप्रसाद वाटप केल्यास किंवा अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. विषबाधेसारखी दुर्घटना घडल्यास आयोजकांवर थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

अवघ्या १०० रुपयांत मिळवा ऑनलाइन परवाना

१. वेबसाइट: एफएसएसएआयच्या अधिकृत पोर्टलवर (foscos.fssai.gov.in) जा.

२. अर्ज प्रक्रिया: होमपेजवरील ‘Apply for Temporary License/Registration’(तात्पुरत्या परवान्यासाठी अर्ज) या पर्यायावर क्लिक करा.

३. माहिती नोंदवा: आयोजकाचे नाव, संपर्क क्रमांक, ठिकाण, तारीख आणि अंदाजे लोकांची संख्या अचूक भरा.

४. कागदपत्रे: आयोजकाचे ओळखपत्र आणि कार्यक्रमाच्या जागेचे प्राथमिक माहितीपत्रक अपलोड करा.

५. शुल्क: फक्त १०० रुपये शासकीय फी ऑनलाइन भरल्यानंतर काही वेळातच तात्पुरता परवाना ई-मेल किंवा पोर्टलवर उपलब्ध होईल.

अन्न निकृष्ट दर्जाचे असल्यास तक्रार कुठे कराल?

टोल-फ्री हेल्पलाइन: अन्नाचा दर्जा खराब असल्यास किंवा अस्वच्छता आढळल्यास १८०० ११ २१०० या राष्ट्रीय टोल-फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधा.

ऑनलाइन तक्रार: ‘FoSCoS’ पोर्टल किंवा ‘Food Safety Connect’ अ‍ॅपवर थेट ऑनलाइन तक्रार नोंदवा. तक्रारीसोबत शक्य असल्यास फोटो/व्हिडिओ आणि ठिकाण, तारीख द्यावी. (तक्रारदाराचे नाव व माहिती पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येते.)

अन्न सुरक्षेसाठी या ४ अटी पाळणे अनिवार्य

  • स्वयंपाक आणि पिण्यासाठी केवळ स्वच्छ किंवा आरओ पाण्याचाच वापर करावा.
  • अन्न बनवणाऱ्या व वाढणाऱ्या स्वयंसेवकांना मास्क, हँडग्लोव्हज आणि हेड कॅप वापरणे अनिवार्य आहे.
  • प्रसाद जास्त वेळ उघड्यावर ठेवू नये. शिळे अन्न वाटल्यास कठोर कारवाई केली जाईल.
  • अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील किंवा सुरक्षित भांड्यांचाच वापर करावा, असेही नियमावलीत नमूद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *