Headlines

‘Heat Dome’ covers half of India, severe heatwave in some states of North and Central India


  • Marathi News
  • National
  • ‘Heat Dome’ Covers Half Of India, Severe Heatwave In Some States Of North And Central India

नवी दिल्ली10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशातील अनेक राज्यांत एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. स्कायमेट या संस्थेच्या मते हे केवळ हवामानातील सामान्य बदल नसून ‘हीट डोम’चा परिणाम आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि दिल्लीमध्ये सध्या निर्माण झालेली उष्णतेची स्थिती याच हीट डोममुळे तयार झाली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार हे संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत वायव्य, मध्य आणि पूर्व भारताच्या बहुतांश भागात भीषण उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. यावेळच्या उन्हाळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मैदानी आणि किनारपट्टीच्या भागात आर्द्रतायुक्त उष्णता जाणवत आहे. त्यामु‌ळे उष्माघाताचा धोका अधिक वाढला आहे. स्कायमेटनुसार ही हवामान प्रणाली गेल्या एका आठवड्यापासून सातत्याने सक्रिय आहे. या स्थितीमुळे उष्णता दीर्घकाळ एकाच ठिकाणी स्थिर राहण्याची शक्यता आहे. परिणामी तापमान वाढले.

ढगांना रोखतो, आर्द्रताही घटते

  • जमिनीच्या पृष्ठभागावरील गरम हवा वरच्या दिशेने सरकते आणि विस्तारते. त्याच वेळी, वरच्या थरातील उच्च दाबाची हवा चक्राकार फिरत खालच्या दिशेने येते.
  • ही हवा खाली येताना अधिक शुष्क आणि गरम होते. त्यातून तापमानात मोठी वाढ होते.
  • या प्रक्रियेत माती व झाडांमधील ओलावा संपू लागतो. उष्णतेची लाट अधिक गंभीर बनते.
  • ही यंत्रणा पावसाचे ढग व मान्सूनचा ओलावा दुसऱ्या दिशेला वळवते. पाऊस पडत नाही.
  • आकाश निरभ्र असल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात व उष्णता कित्येक पटीने वाढते.
  • सध्या मध्य भारतावर एक ‘अँटीसायक्लोन’ म्हणजेच ‘विपरीत चक्रीवादळा’ची स्थिती निर्माण झाली आहे.
  • ही स्थिती हवेला खालच्या दिशेने ढकलते (ज्यामुळे उष्णता वाढते).

दिल्लीत प्रचंड उष्णतेचा अंदाज

  • येत्या आठवड्यात मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये उन्हाचा कडाका अधिक वाढेल. मंगळवार २३ एप्रिल ते शनिवार, २७ एप्रिल दरम्यान या राज्यांमध्ये तापमानाचे नवे विक्रम प्रस्थापित होऊ शकतात.
  • दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडमध्ये शुक्रवार, २४ एप्रिल आणि शनिवार, २५ एप्रिल रोजी भीषण उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. ईशान्येतही पाऊस शक्य.

ही प्रणाली कशी काम करते समजून घेऊ

‘हीट डोम’ म्हणजे काय? वातावरणातील हवेचा जास्त दाब एखाद्या ‘झाकणा’ प्रमाणे काम करतो आणि गरम हवेला जमिनीपाशीच रोखून धरतो तेव्हा त्याला ‘हीट डोम’ म्हणतात. यामुळे गरम हवा वर जाऊ शकत नाही आणि सतत दाब पडल्यामुळे ती अधिकच तप्त होत राहते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *