Headlines

KEM Hospital Mumbai Renaming Demand by Minister Mangaprbhat Lodha


मुंबईतील सर्वसामान्यांचे आधारवड आणि गोरगरिबांसाठी अत्यंत परवडणारे महापालिकेचे प्रसिद्ध किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय सध्या नामांतराच्या मागणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला

.

मंगल प्रभात लोढा यांनी दुसऱ्यांदा नामांतर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांनी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहून या प्रक्रियेला गती देण्यास सांगितले आहे. केईएम हे नाव ब्रिटिश काळातील असल्याने ते बदलून भारतीय संस्कृतीशी संबंधित नाव देण्यात यावे, अशीह मागणी लोढा यांनी केली आहे.

कोणते नवीन नाव देण्याची मागणी?

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ते ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करावे, अशी अधिकृत शिफारस महापालिकेकडे केली आहे. विशेष म्हणजे, या प्रस्तावित नावामुळे रुग्णालयाची ‘केईएम’ (KEM) ही जुनी ओळख आणि संक्षिप्त नाव तांत्रिकदृष्ट्या कायम राहील, असा दावाही या पत्राद्वारे करण्यात आला आहे.

केईएम रुग्णालय ही केवळ एक वास्तू नसून ती मुंबईची जागतिक स्तरावर असलेली महत्त्वाची ओळख आहे. यापूर्वी मंत्री लोढा यांनी ही मागणी केली असताना त्यांना राजकीय आणि आरोग्य अशा दोन्ही क्षेत्रांतून तीव्र टीकेला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी अधिकृत पत्राद्वारे हा मुद्दा लावून धरल्याने मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. हे रुग्णालय महापालिकेच्या प्रशासकीय अखत्यारीत येत असल्याने, प्रशासन यावर नक्की काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

किंग एडवर्ड यांच्या स्मरणार्थ रुग्णालय स्थापन

1926 मध्ये ब्रिटनचे राजे किंग एडवर्ड (सातवे) यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेले हे रुग्णालय मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचा एक ऐतिहासिक वारसा आहे. या वारशात बदल करण्याच्या प्रस्तावाला वारसाप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांकडून विरोधाची चिन्हे असतानाच, रुग्णालयाची सामाजिक उपयुक्तताही विशेष महत्त्वाची ठरते. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत माफक दरात उत्कृष्ट उपचार मिळत असल्याने, मुंबई शहर आणि उपनगरातील गोरगरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी केईएम रुग्णालय आजही एक मोठा आधारस्तंभ ठरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *