मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सोलापुरातून जोरदार पलटवार केला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा करत हाके यांनी सरकारसह ओबीसी न
.
ओबीसींचे आरक्षण संपले आहे
राज्यातील ओबीसी आरक्षण संपले आहे की नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. मनोज जरांगे जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“महसूलमंत्र्यांना मी गिनत नाही, असं दाखवलं जात आहे. ही दहशतवादाची भाषा आहे,” असा घणाघात हाके यांनी केला.
ओबीसी नेत्यांनी आता भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी सवाल केला की, शासनकर्तेच मोठ्या प्रमाणावर ओबीसी म्हणून निवडून आले असतील तर मूळ ओबीसी कुठे आहेत?
चार प्रमाणपत्रे रद्द झाली तर जरांगे थयथय नाचतात
कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही हाके यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. “ओबीसींच्या जागा मराठा-कुणबी यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण संपले आहे. कुणबीची चार प्रमाणपत्रे रद्द झाली तर जरांगे थयथय नाचत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांवर होत असलेल्या वक्तव्यांवरूनही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली जाते, महसूलमंत्र्यांच्या व्यंगावरून टिप्पणी केली जाते; मग राज्यातील पुरोगामी विचारांचे लोक कुठे गेले, असा सवाल हाके यांनी केला.
“हा वर्णभेद नाही का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘अत्रे-ठाकरेंची भाषा पाहिली, पण अशी भाषा आता आणली’
मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेवर टीका करताना हाके म्हणाले की, महाराष्ट्राने आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांची आक्रमक भाषा पाहिली आहे. मात्र, आता जरांगे यांच्या माध्यमातून अशा प्रकारची भाषा महाराष्ट्रात आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जरांगे टीका करत असल्याचे सांगत हाके यांनी महायुतीतील नेत्यांनाही प्रश्न विचारले. “विखे पाटील, उदय सामंत किती वेळा तुम्ही त्यांना भेटायला जाणार?” असा सवाल त्यांनी केला.
जरांगे यांनी संजय शिरसाट यांचे पावणे दोनशे फोन आले असल्याचे सांगितल्याच्या मुद्द्यावरही हाके यांनी प्रश्न उपस्थित केला. “बाकीच्यांना एक मताचा अधिकार आणि त्यांना जास्त आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू
राज्यातील शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरूनही लक्ष्मण हाके यांनी सरकारला घेरले. भरतीमध्ये ओबीसींना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
“शिक्षकांची नोकरभरती निघाली आहे. कटऑफमध्ये लोकांना दहा टक्केही जागा मिळणार नाहीत. कुठला रोस्टर तुम्ही सांगत आहात?” असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रात सध्या सामाजिक अन्याय सुरू असल्याचा गंभीर आरोप करत हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले.
आज आम्ही जात्यात आहोत, उद्या तुम्ही असणार
लक्ष्मण हाके यांनी दलित समाजालाही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. ओबीसींचे आरक्षण धोक्यात असल्याचा दावा करत त्यांनी इतर वंचित समाजघटकांनाही सावध केले.
“आज आम्ही जात्यात आहोत, उद्या तुम्ही असणार आहात,” असा इशारा त्यांनी दलित बांधवांना दिला.
यापूर्वीही हाके यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर टीका करत त्यांची लढाई आता केवळ आरक्षणापुरती मर्यादित राहिलेली नसल्याचा दावा केला होता. मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणावर ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास मूळ ओबीसी, भटक्या-विमुक्त, बलुतेदार-अलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या आरक्षणावर परिणाम होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…
शिवसेनेच्या 6 खासदारांच्या विलीनीकरणावर सुनावणी: पक्षांतरबंदी कायद्याचे थेट उल्लंघन असल्याचा ठाकरे गटाचा दावा, सुप्रीम कोर्टात काय घडले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेले विलीनीकरण बेकायदेशीर असल्याचा दावा करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लोकसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणाला दिलेल्या मंजुरीला आव्हान देत, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ही याचिका दाखल केली आहे. या महत्त्वपूर्ण याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. येथे वाचा संपूर्ण बातमी