![]()
राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘वैभव संगमन योजने’अंतर्गत मिळालेल्या मान्यतेनुसार आरपीजी फाऊंडेशनने शिवडी किल्ला देखभालीसाठी दत्तक घेतला आहे. या योजनेंतर्गत किल्ल्यावर एक भव्य संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाच्या माध्य
.
राज्यातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या घोषणेनुसार, आता गडकिल्ले आणि मंदिरांच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन विकास समितीतून (DPDC) 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. या संवर्धन कामांसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडून रीतसर तांत्रिक मान्यता दिली जाईल.
UNESCO नामांकित किल्ल्यांवर सुरक्षा भक्कम
राज्यातील युनेस्कोच्या यादीत असलेल्या चार प्रमुख किल्ल्यांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यात येणार आहे. प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी या किल्ल्यांवर घडणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाचे एकूण 80 जवान तैनात केले जाणार असून, प्रत्येक किल्ल्यावर 19 सुरक्षा रक्षक आणि 1 पर्यवेक्षक अशी त्यांची नेमणूक असेल.
बाणगंगा परिसराचे जतन
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरातील वारसा जतन करण्याचे आणि या स्थळाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या ऐतिहासिक वारसा जतन मोहिमेसोबतच स्थानिक महिलांच्या सक्षमीकरणावरही भर देण्यात आला असून, 150 हून अधिक महिलांना उद्योजकता, शिलाईकाम आणि आरोग्य यांसारख्या विषयांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
वरळी कोळीवाड्यात पर्यटन आणि सुशोभीकरण
विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत 500 हून अधिक पर्यटकांना या ऐतिहासिक वारसा स्थळांशी जोडण्यात आले आहे. याच धर्तीवर वरळी किल्ला आणि वरळी कोळीवाडा येथेही सुशोभीकरणाची कामे राबवली जात आहेत. वरळी कोळीवाड्यात आतापर्यंत 71 पेक्षा जास्त पथदिवे, 30 पेक्षा जास्त माहिती फलक आणि सातपेक्षा अधिक आकर्षक सार्वजनिक भित्तिचित्रे बसवण्यात आली आहेत.