नागपुरात गेल्या साडेचार वर्षांत ६४० हून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात २४२ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाकडून मागवलेल्या माहितीनंतर ही धक्कादायक आकड
.
मिळालेल्या माहितीनुसार, सिताबर्डी वाहतूक परिमंडळात साडेचार वर्षांत ७७ अपघात झाले असून, त्यात ७९ जणांचा मृत्यू झाला. यात अवजड वाहनांमुळे १५ अपघात आणि १५ मृत्यू, तसेच २३ पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू समाविष्ट आहे. याशिवाय, महामार्गांवर १९ तर उड्डाणपुलांवर ३ अपघातांत तितक्याच लोकांचा बळी गेला. सदर वाहतूक परिमंडळात एकूण ११८ प्राणांतिक अपघातांमध्ये १२७ नागरिकांनी जीव गमावला. येथे ट्रक व इतर अवजड वाहनांमुळे २६, तर ३२ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर ४५ लोकांचा मृत्यू नोंदवला गेला आहे.
लकडगंज वाहतूक परिमंडळात ४३ लोकांचा मृत्यू झाला, ज्यात अवजड वाहनांमुळे ४ आणि पादचाऱ्यांचे ३० बळी आहेत. सक्करदरा वाहतूक परिमंडळात ४४१ अपघातांची नोंद झाली असून, यात २८ जणांचा जड वाहनांमुळे, तर ३४ पादचाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. सक्करदरा येथील उड्डाणपूल आणि महामार्गांवर एकूण १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातांमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचाही मृत्यू झाला आहे. याच साडेचार वर्षांच्या कालावधीत सदर वाहतूक परिमंडळात ३ पोलिसांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, तर सक्करदरा परिमंडळातही ३ पोलिसांनी आपले प्राण गमावले. २०२५ मध्ये कॉटन मार्केट वाहतूक परिमंडळात एका महिला पोलिस अंमलदाराचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.
हे ही वाचा…
सरसंघचालकांना रामरक्षा पठणाचे निमंत्रण देणे कर्तव्य:नागपूर हिंदुत्वाची राजधानी – संजय राऊत; भाजपवरही साधला निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी नागपूरला हिंदुत्वाची राजधानी म्हटले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांना ‘रामरक्षा पठण’ कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आपले कर्तव्य असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सविस्तर वाचा…
उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण केवळ ढोंग:अयोध्या निमंत्रण नाकारले, आता जनाधार गेल्यावर रामाची आठवण; बावनकुळेंची टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नागपूर येथील उद्धव ठाकरे यांचे ‘रामरक्षा पठण’ म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचे बावनकुळे म्हणाले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. सविस्तर वाचा…