Headlines

Nihangs warn…if action is not taken in 2 days, they will march towards Uttarakhand, Nihangs will camp in Paunta Sahib for two days


  • Marathi News
  • National
  • Nihangs Warn…if Action Is Not Taken In 2 Days, They Will March Towards Uttarakhand, Nihangs Will Camp In Paunta Sahib For Two Days

मनमीत | डेहराडून7 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये निहंग शीख आणि प्रशासन यांच्यात सुरू असलेला वाद तूर्तास टळला आहे. शुक्रवार सकाळी उत्तराखंड सरकारच्या अधिकाऱ्यांची आणि निहंग शीख प्रतिनिधींची हिमाचलमधील पाउंटा साहिब गुरुद्वारात बैठक झाली. बैठकीनंतर सरकारने निहंग शिखांच्या प्रमुख मागण्यांना संमती दिली. यानंतर त्यांनी नियोजित उत्तराखंड मार्गाक्रमण तूर्तास पुढे ढकलले आहे. मात्र, दोन दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास उत्तराखंडकडे कूच करणार असल्याचे निहंगांनी स्पष्ट केले. ते पुढील दोन दिवस पाउंटा साहिब गुरुद्वारातच तळ ठोकून राहतील.

प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत सहभागी असलेले मुख्य जत्थेदार जगदीप सिंह यांनी सांगितले की, उत्तराखंड प्रशासनासमोर तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. यात कर्णप्रयाग घटनेत अटक करण्यात आलेल्या चारही निहंग शिखांची सुटका, निहंग पोशाखाचा अवमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई आणि अटक केलेल्या निहंगांना भेटण्याची परवानगी यांचा समावेश आहे. याशिवाय एम्समध्ये दाखल असलेल्या जखमी निहंगच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सोशल मीडियातील अपप्रचारावर कारवाई, हेमकुंड-चारधाम यात्रा सुरळीत राहणार

निहंग शिखांशी संबंधित वादावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रक्षोभक व्हिडिओ आणि अपप्रचारावर कडक कारवाई करण्याची तयारी उत्तराखंड सरकारने केली आहे. काही लोक या वादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा लोकांची ओळख पटवून कारवाई केली जाईल. दुसरीकडे, प्रशासनाने हेमकुंड साहिब यात्रा सुरळीत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. चर्चेसाठी गेलेले हरिद्वारचे एसएसपी नवनीत भुल्लर म्हणाले की, हेमकुंडासह चारधाम यात्रा सामान्यपणे सुरू आहे.

कर्णप्रयाग : निहंगांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून प्रकरण तापले

उत्तराखंडमधील निहंगांशी संबंधित वाद १६ जून रोजी चमोलीतील कर्णप्रयाग येथे सुरू झाला. हेमकुंड साहिब यात्रेसाठी आलेल्या काही निहंग शीख आणि स्थानिक लोकांमध्ये पार्किंगवरून वाद झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आणि पोलिसांनी चार निहंग शिखांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले. अटक केलेल्या निहंगांशी गैरवर्तन करण्यात आले आणि त्यांना पगडीशिवाय न्यायालयात हजर करण्यात आले, असा आरोप शीख संघटनांनी केला. यामुळे संतापलेल्या निहंगांनी नगरासू गुरुद्वारावर तळ ठोकला आहे.

तणावाच्या पार्श्वभूमीवर आयटीबीपीच्या तुकड्याही तैनात

या वादामुळे उत्तराखंड सरकारसाठी सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची बनली आहे. प्रशासनावर आधीच चारधाम यात्रेचा ताण आहे. अशा स्थितीत खबरदारी म्हणून उत्तराखंड पोलिसांसोबत आयटीबीपीच्या तुकड्यांनाही अनेक ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *