Headlines

वेरूळ घाटात बिबट्याचे दर्शन; प्रवाशांमध्ये भीती:नागरिकांना वन विभागातर्फे खबरदारीचा इशारा‎




खुलताबाद-वेरूळ परिसरात सध्या बिबट्याच्या वावरामुळे नागरिक, भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी रात्री शहरालगतच्या शंजरी हॉटेलजवळ म्हणजेच वेरूळ घाटाच्या सुरुवातीलाच एका बिबट्याचे दर्शन झाले. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर, सुलिभंजनचा दत्त डोंगर आणि थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ येथे दररोज हजारो पर्यटक आणि भाविक येत असतात. मात्र, काही दिवसांत वेरूळ घाट, म्हैसमाळ घाट आणि सुलिभंजन घाटात बिबट्याचा वावर वाढला आहे. दत्त मंदिर आणि म्हैसमाळच्या गिरिजादेवीच्या दर्शनासाठी भाविक पायी किंवा दुचाकीने घाटातून प्रवास करतात. मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे या मार्गावरील रात्रीची आणि पहाटेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असून, वन विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे. प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा संवेदनशील आणि मुख्य घाट परिसरात वनविभागाची गस्त तात्काळ वाढवावी, बिबट्याचा वावर असलेल्या मुख्य वळणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *