![]()
पैठण एमआयडीसीमध्ये उद्योगविस्ताराला नव्याने गती मिळाली असून येथील नामांकित कंपन्या आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व विस्तार करत आहेत. याच धर्तीवर आणखी पाच नवीन मोठे उद्योगही एमआयडीसीमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. या पा
.
सध्या पैठण औद्योगिक वसाहतीमध्ये इनकोर हेल्थकेअर, लेझर इंडिया, हिंदुस्तान कंपोझिट, मीनाक्षी अॅग्रो आणि मॅट्रिक्स लाइफ यांसारख्या प्रमुख कंपन्यांकडून उत्पादन विस्ताराची कामे वेगाने सुरू आहेत. नवीन आधुनिक यंत्रसामग्रीची उभारणी करणे, उत्पादन क्षमता वाढवणे, अतिरिक्त शेडचे बांधकाम करणे आणि आवश्यक मनुष्यबळाची भरती करणे यांवर कंपन्यांनी विशेष भर दिला आहे. इनकोर हेल्थकेअर या कंपनीच्या विस्तारामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. उद्योगक्षेत्राशी संबंधित अभ्यासासाठी राधिका मर्चंट यांनी अनेक वेळा पैठण परिसराला प्रत्यक्ष भेटी दिल्या होत्या. त्यांच्या या भेटींनंतर इनकोर कंपनीच्या विस्तार प्रक्रियेला गती मिळाली आहे. नवीन येऊ घातलेल्या उद्योगांसाठी प्रशासनाकडून भूखंड उपलब्धता, रस्ते, अखंडित वीज आणि पाणीपुरवठा यांसह प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत. पैठण एमआयडीसीतील काही विद्यमान कंपन्या सध्या विस्तार करत आहेत. तसेच ४ ते ५ नवीन कंपन्या उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असून त्यासंदर्भातील प्रस्ताव आणि नियोजन वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या नव्या उद्योगांबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे एमआयडीसीचे अधिकारी दत्तात्रय सानप यांनी सांगितले. या औद्योगिक विस्तारामुळे केवळ रोजगारच वाढणार नाही, तर वाहतूक, लॉजिस्टिक्स, हॉटेल व्यवसाय, किरकोळ व्यापार, बांधकाम क्षेत्र, तांत्रिक सेवा, अनेक लघुउद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. पर्यायाने पैठण तालुक्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे एक नवी दिशा मिळेल. पैठण एमआयडीसीत नवीन उद्योग आणण्यासाठी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले.
मंत्रालय स्तरावर सातत्याने उद्योगांसाठी पाठपुरावा सुरू