नागपूर – वर्ध्यात उष्णतेचा यलो अलर्ट:सकाळी ११ ते ४.३० पर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई, शाळांना सूचना
हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी १६ ते १८ मे दरम्यान ‘हीट वेव्ह’चा यलो अलर्ट जारी केला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत. उष्णतेच्या तीव्र लाटेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष आढावा बैठक झाली. या बैठकीत…