'ते पन्नास दिवस' कादंबरीची प्रेरणा स्थलांतरित मजुरांचा संघर्ष:प्रगतिशील लेखक संघाच्या 'गाठभेट लेखकाशी' कार्यक्रमात पवन भगत यांचे मत
अमरावती: ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे लेखक पवन भगत यांनी सांगितले की, कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या वाट्याला आलेला जीवघेणा संघर्षच त्यांच्या कादंबरीची प्रेरणा ठरला. प्रगतिशील लेखक संघाच्या चांदूर रेल्वे शाखेतर्फे आयोजित ‘गाठभेट लेखकाशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. करोना महामारीच्या काळात भारताच्या विविध महानगरांत स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल अत्यंत वेदनादायी होते. बंद पडलेली उद्योग…