Headlines

विजय यांचे कमल हासन आणि प्रकाश राज यांनी केले अभिनंदन:अभिनेत्री तृषा शपथविधीत सहभागी झाली, थलापतीच्या आई आणि बहिणीची गळाभेट घेतली

अभिनेता ते नेते बनलेले थलापती विजय यांनी रविवारी तमिळनाडूच्या ९व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित समारंभात राहुल गांधी आणि तृषा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साऊथ सुपरस्टार कमल हासन आणि अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांचे अभिनंदन केले. कमल हासन म्हणाले, ‘तमिळगा वेत्री कळगमचे अध्यक्ष आणि तमिळनाडूचे माननीय…

Read More

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मे महिन्यात ₹14,231 कोटी काढले:2026 मध्ये आतापर्यंत ₹2 लाख कोटींची विक्री; कारण- जागतिक बाजारात अनिश्चितता

मे महिन्यात भारतीय शेअर बाजारातून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (FPIs) माघार सुरूच आहे. जागतिक आर्थिक चिंतेमुळे या वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून ₹2 लाख कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल (NSDL) च्या आकडेवारीनुसार, केवळ मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत ₹14,231 कोटींची विक्री केली आहे. 2025 च्या तुलनेत या वर्षी अधिक दबाव 2026 या वर्षात आतापर्यंतची…

Read More

नागपुरात 'पूर्ती' संस्थेचा रौप्य महोत्सव, गडकरींच्या मार्गदर्शनाखाली:आमिर खान, नाना पाटेकर 'जलसंवाद' अन् 'जलक्रांती परिषदेत' होणार सहभागी

गेल्या अडीच दशकांपासून जलसंधारणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे’चा रौप्य महोत्सवी सोहळा 17 आणि 18 मे 2026 रोजी नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमात ‘जलसंवाद’ आणि ‘जलक्रांती परिषद’ आयोजित केली आहे. यात चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि आमिर खान यांच्यासह देशभरातील जलतज्ज्ञ…

Read More

केंद्राची बंदी असताना नागपुरात दिला "तिहेरी तलाक':मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ; तहसील पोलिसांत पतीसह सासूवर गुन्हा

देशात ‘तिहेरी तलाक’ प्रथा कायद्याने गुन्हा ठरवूनही नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी जन्माला आल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा छळ करून तिला पतीने तोंडी तिहेरी तलाक दिला. या प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी पती इमरान रशीद शेख (वय 38) आणि सासू सईदा बेगम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुक्सार शेख सोहेल शेख (वय 32) यांनी…

Read More

टॉप-10 कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मूल्य ₹1 लाख कोटींनी घटले:SBI टॉप लूजर, मूल्य 44 हजार कोटींनी घटले; एअरटेल-टीसीएसचे मार्केट कॅपही घटले

मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 1 लाख कोटी रुपयांनी घटले. या काळात SBI चे मार्केट मूल्य सर्वाधिक घटले आहे. SBI चे मार्केट मूल्य ₹44,722 कोटींनी घटून ₹9.41 लाख कोटींवर आले. याशिवाय एअरटेल, TCS आणि लार्सन अँड टुब्रोचे मार्केट मूल्यही घटले आहे. तर रिलायन्स, HDFC बँक, ICICI…

Read More

मुलगी झाल्यामुळे विवाहितेला तीन तलाक:नागपुरातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल; नेमका काय प्रकार घडला वाचा

मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला तीन तलाक दिल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या इतवारी – मस्कासाथ परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती व सासूविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पीडित महिलेचा 31 मे 2024 रोजी जाफरनगर येथील एलन व्हिला येथे इमरानसोबत मुस्लिम पद्धतीने विवाह झाला होता….

Read More

या आठवड्यात इराण-अमेरिका तणावावर गुंतवणूकदारांचे लक्ष:चौथ्या तिमाहीच्या निकालांसह 5 घटक दिशा ठरवतील; निफ्टीसाठी 24,500 वर रेझिस्टन्स

उद्या 11 मे पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात शेअर बाजारात बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल, अमेरिका-इराण तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यांसारखे घटक बाजाराची दिशा ठरवतील. पुढील आठवड्यात बाजारात काय होऊ शकते, ते समजून घेऊया… सपोर्ट आणि रेझिस्टन्स सपोर्ट झोन: 23,936 | 23,870 | 23,820 | 23,466 | 23,335 | 22,858 सपोर्ट…

Read More

जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताचे नाते विसरले:वडिलांनीच सावत्र मुलाचा काटा काढला, घराशेजारीच रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

बारामती तालुक्यातील जोगवडी परिसरात जमिनीच्या वाटपाच्या वादातून सूरज संजय गुरुमकर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृत सूरजचे वडील, सावत्र आई आणि सावत्र भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, परवा रात्री सूरजचा मृतदेह घराशेजारीच संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे सूरजचा मृत्यू झाल्याचा…

Read More

तळेगाव एमआयडीसी हादरली:8 व्या मजल्यावरून पडून 34 वर्षीय विवाहितेचा अंत, तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव एमआयडीसी परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून पडून 34 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे हृदयद्रावक दृश्य काही नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा मनीष शंकर (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे….

Read More

सुप्रिया सुळेंच्या अपघातावर सुनील मानेंकडून संशय:ज्यांचा अपघात झाला त्यांना शंका आली तर नक्कीच चौकशी होईल, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला शनिवारी रात्री अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. या अपघातावर सुनील माने यांच्याकडून शंका व्यक्त केली गेली आहे. सुनील माने म्हणाले, आमचे असे म्हणणे आहे की अजितदादांचा घातपात करण्यात आला, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा…

Read More