Headlines

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात 'आप'चा मोर्चा:महागाईविरोधात आंदोलन; पुणे मनपाला दिले ७ 'प्रति-आव्हाने'

पुण्यात आम आदमी पार्टीने (आप) पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किमती तसेच महागाई व बेरोजगारीविरोधात सोमवारी अनोखे ‘बैलगाडी आंदोलन’ केले. ‘आप’च्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयापासून पुणे महानगरपालिका इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘पेट्रोलचे भाव कधी कमी होणार? मेलोडी खावो, खुद जान जाओ’ आणि ‘महागाई…

Read More

नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवत 4 किलोमीटर फरफटत नेलं:मुरूम माफियांची दहशत वाढली; नागपुरात कायद्यालाच खुलं आव्हान

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे. बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना मुरूम माफियांनी थेट चालत्या जेसीबीला लटकवत तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महसूल आणि पोलिस…

Read More

महेश नवमीच्या शुभपर्वावर निघाली देखणी शोभायात्रा:वायएसपीचे सुनील राणा यांनी राजकमल चौकात केले स्वागत‎

प्रतिनिधी | अमरावती महेश नवमीच्या पावन पर्वानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या देखण्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, धार्मिक देखावे, आकर्षक रथ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी शोभायात्रेची शोभा वाढवली. युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात जल्लोषात शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला…

Read More

उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर सहा खासदार दिल्लीत दाखल:आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार, उपमुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण उद्धवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र देऊ शकतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. सूत्रांनी सांगितले की, बुधवारी सकाळी आधी शिंदेंची या खासदारांसोबत बैठक होईल….

Read More

वंचित घटकांत योजना पोहोचविण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी:कन्नडला महाराजस्व अभियानाचा उत्साहात समारोप‎

शासनाच्या योजना दुर्गम भागात आणि वंचित घटकात पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून जनजागृती करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी शुक्रवारी महाराजस्व अभियानाच्या समारोप प्रसंगी केले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इनडोअर सभागृहात आजपर्यंत दहा मंडळात झालेल्या महाराजस्व अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी गोरड म्हणाले, शासनाने…

Read More

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका:सनद फी माफ करण्याची महसूलमंत्र्यांची घोषणा, ग्रामविकास विभाग तयार करणार प्रस्ताव

ग्रामपंचायत नमुना ८ दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका देण्यासह सनद फी माफ करण्याची असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. याबाबत ग्रामविकास विभागाने प्रस्ताव तयार करुन त्याची मंजूरी घ्यावी असेही ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मालमत्तांचे…

Read More

सारंग मांडके, सारंग भोईरकर यांना द. मा. मिरासदार पुरस्कार:जन्मशताब्दीनिमित्त गौरव; वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे युवा कलाकार सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना यंदाचा द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी चरित्र कथन आणि स्वरचित काव्याद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या कलाकारांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी आणि सचिव सुनेत्रा मंकणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त हरिभाऊ मिरासदार…

Read More

एमआयटी डब्ल्यूपीयूत 'विश्वनोव्हा 2026' चे आयोजन:कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर; देशभरातून 700 हून अधिक संघांचा सहभाग

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे ‘विश्वनोव्हा २०२६’ या बौद्धिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातून ७०० हून अधिक संघांमधील ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्यावहारिक उपयुक्तता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अंतर्भाव करणे आधुनिक युगात अपरिहार्य असल्याचे मत अ‍ॅक्सेचरचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहोत्रा यांनी व्यक्त केले. ‘विश्वनोव्हा २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

रोपट्यांचे विस्तीर्ण नंदनवनात रूपांतर:फुलंब्रीत 753 वृक्षांचे लुंबिणी उद्यान, डॉ. ठोंबरे यांच्या प्रयत्नातून पर्यावरणाचे संवर्धन‎

निसर्ग संवर्धन केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवता आले पाहिजे. असे झाले तर गोड फळे मिळतातच. याचे जिवंत उदाहरण फुलंब्रीच्या श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात सापडते. माजी प्राचार्य तथा संस्थेचे विश्वस्त डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या पुढाकारातून लावलेल्या रोपट्यांचे आज विस्तीर्ण नंदनवनात रूपांतर झाले आहे. २२ गुंठ्यातील या परिसरात ७५३ विविध प्रकारची…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्ता 30 टक्क्यांपर्यंत वाढला; प्रताप सरनाईक यांची विधानसभेत घोषणा

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात घसघशीत वाढ करण्याची घोषणा आज विधानसभेत केली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक…

Read More