बकरी ईद सप्ताहात 'अंनिस'चे रक्तदान शिबिर:एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने यांच्या उपस्थितीत 38 दात्यांचे रक्तदान
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) अमरावती आणि बडनेरा शाखेच्या वतीने ‘मुक्या प्राण्यांची कुर्बानी न देता, मानवतेसाठी रक्तदान करूया’ या सामाजिक संदेशासह रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. बकरी ईद / ईद-उल-अजहा सप्ताहातील हा उपक्रम बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी (इर्विन दवाखाना) येथे पार पडला. तळपत्या उन्हाची पर्वा न करता ३८ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवला….