Headlines

पाटबंधारे विभागाकडून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी काम सुरू:बंद असलेल्या जलविद्युत केंद्रासाठी ६ कोटी रुपये खर्च करून गार्ड वॉल




पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र मागील तीन वर्षांपासून बंदच आहे, त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही केंद्र सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. असे असतानाही पिचिंगसाठी ६ कोटी रुपयांची गार्ड वॉल उभारण्यात येत आहे. मात्र जलविद्युत केंद्राची दुरुस्ती होत नसल्याने व कधी होईल याची शाश्वती नसतानादेखील त्याच्या पायथ्याशी पाटबंधारे विभागाच्या वतीने ६ कोटी रुपये खर्च करून पिचिंगचे काम करण्यात येत आहे. कुंभारे, सहायक अभियंता जलविद्युत केंद्र, पैठण जलविद्युत केंद्र तीन वर्षांपासून बंद आहे. ते सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जुने तंत्र असल्याने ते कधी सुरू होईल हे सांगता येणार नाही. ते सुरू करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलवण्यात येणार आहे. जे काम पिचिंगचे होत आहे ते पाटबंधारे विभाग करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *