Headlines

फुलंब्रीत अतिक्रमणांवर अखेर जेसीबी चालला:महात्मा फुले चौकाने घेतला मोकळा श्वास‎




प्रतिनिधी | फुलंब्री फुलंब्री शहराची डोकेदुखी ठरलेल्या वाहतूक कोंडीवर अखेर प्रशासनाने हातोडा चालवला आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री येथील महात्मा फुले चौकातील अतिक्रमणांवर नगरपंचायत, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत २६ पेक्षा अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली. ‘दिव्य मराठी””ने या समस्येबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ही धडक कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊनही फुलंब्री शहरातील महात्मा फुले चौकात दररोज मोठी वाहतूक कोंडी होत होती. यामुळे स्थानिक नागरिकांसह अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटकही त्रस्त झाले होते. अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरूच राहणार मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे म्हणाले की, नगरपंचायतीच्या वतीने ही अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर कोणीही व्यवसाय थाटू नये किंवा अतिक्रमित जागा भाड्याने घेऊ नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *