रुंदीकरणाच्या कामाने सिन्नर-ठाणगाव मार्गावर अपघाताची भीती:वृक्ष धोक्यात, तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी
सिन्नर-ठाणगाव मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अनेक जुन्या वृक्षांची मुळे उघडी पडली असून ही झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघाताची भीती व्यक्त होत आहे. विकासकामांदरम्यान अनेक वृक्षांच्या बुंध्याभोवतीची माती काढून टाकण्यात आल्याने त्यांची मुळे पूर्णपणे उघडी पडली आहेत. काही ठिकाणी वृक्ष केवळ मुळांच्या आधारावर उभे…