पिंपळगाव बसवंतला जेईई-सीईटी परीक्षेतील गुणवंतांची मिरवणूक:कै. बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शहरातून ‘यशोत्सव रॅली’
प्रवेश परीक्षा जेईई, सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कै. बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहरातून काढण्यात आलेल्या ‘यशोत्सव रॅली’ने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले. . महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर बनकर,…