Headlines

पिंपळगाव बसवंतला जेईई-सीईटी परीक्षेतील गुणवंतांची मिरवणूक:कै. बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शहरातून ‘यशोत्सव रॅली’‎



प्रवेश परीक्षा जेईई, सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कै. बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहरातून काढण्यात आलेल्या ‘यशोत्सव रॅली’ने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले.

.

महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर बनकर, सहसचिव अरुण महाले, व्यवस्थापकीय संचालक दिनेश आनारसे आदींसह शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रॅलीसाठी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष सजविण्यात आलेली विंटेज व्हॅन, आकर्षक रथ आणि ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना मानाचा फेटा बांधून पुष्पहारांनी सन्मानित करण्यात आले. गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी आणि जयघोषामुळे परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान शहरातील नागरिकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *