शेवगाव तहसीलमध्ये अस्वच्छतेचा रामभरोसे कारभार:कर्मचाऱ्यांकडूनच गुटख्याची रंगरंगोटी
शेवगाव तहसील कार्यालयात सध्या स्वच्छतेच्या नियमांची ऐशीतैशी होताना दिसत आहे. ज्या प्रशासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवायचे, त्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, दिव्यांगांसाठी बनवलेला रॅम्प कचराकुंडी बनला असून, कार्यालयातील भिंती गुटखा-माव्याच्या पिचकाऱ्यांनी लालभडक झाल्या आहेत. या अस्वच्छतेमागे बाहेरील व्यक्तींपेक्षा स्वतः कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रवेशद्वाराजवळील रॅम्पवर प्लास्टिक पिशव्या,…