Headlines

संभाजीनगर विधान परिषद भाजप तर नाशिक शिंदेसेना लढवण्याची शक्यता:17 जागांवर महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात




विधान परिषदेतील १७ जागांसाठी १८ जूनला निवडणूक होत आहे. दोन दिवसांपूर्वी महायुतीची दिल्लीत बैठक झाली. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपतर्फे जागा वाटपात वाटाघाटींचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. सूत्रांनी सांगितले की, महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय शनिवारी दुपारी होऊ शकतो. भाजप १२, शिंदेसेना ३, राष्ट्रवादी अजित पवार गट २ जागा लढवेल. दिल्लीतील बैठकीत छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचा तिढा होता. तो सुटला आहे. संभाजीनगरची जागा पहिल्यांदाच भाजप तर नाशिकची जागा शिंदेसेना लढवण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे मविआने १५ जागांचे वाटप ठरवले. काँग्रेस ८, उद्धवसेना ४, राष्ट्रवादी शरद पवार गट ३ जागा लढवणार आहे. मविआत नाशिक, नांदेडसाठी रस्सीखेच सुरू आहे. उद्धवसेना असेल छोटा भाऊ या निवडणुकीत मविआत उद्धवसेना नव्हे तर काँग्रेस मोठा भाऊ असेल. १५ जागांचे वाटप असे. काँग्रेस : चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर, नागपूर.उद्धवसेना : रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना. शरद पवार गट : पुणे, ठाणे, सांगली-सातारा. (नाशिक, नांदेड प्रलंबित) महायुतीत भाजपचा वरचष्मा भाजप : सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना, धाराशिव-लातूर-बीड आणि नागपूर. शिवसेना (शिंदेसेना) : ठाणे, नाशिक आणि यवतमाळ. राष्ट्रवादी अजित पवार गट : पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग. मविआत नाशिक, नांदेडसाठी रस्सीखेच महायुतीत सर्व जागांसाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांत असंतोषाची धग कायम आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगरात भाजपचा आग्रह नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरत आहे. जळगावात मंत्री गुलाबराव पाटील स्वत:च्या मुलासाठी आग्रही आहेत. परभणी-हिंगोलीसाठी अर्जुनराव खोतकरांनी जोर लावल्याने शिंदेसेनेत अस्वस्थता आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, स्थानिकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान मुख्यमंत्री फडणवीसांपुढे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *