- Marathi News
- National
- New Monsoon Forecast, Risk Of Drought This Year, 10% Less Rainfall Creates Drought Conditions
अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

देशाला या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी सुधारित अंदाजात म्हटले की, यंदा मान्सूनदरम्यान सरासरी पावसाच्या तुलनेत १० टक्के कमी पाऊस होऊ शकतो. मान्सूनदरम्यान एल निनोची परिस्थिती निर्माण होणे हे याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
विभागाने एप्रिलमधील पहिल्या अंदाजात म्हटले होते की, मान्सूनदरम्यान होणारा सामान्य सरासरी पाऊस ८७ सेमीच्या ९२ टक्के असू शकतो, तर शुक्रवारी त्यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या ९० टक्के पाऊस होऊ शकतो. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, या अंदाजात ४% कमी किंवा जास्त होऊ शकते. स्थिती मान्सूनसाठी अनुकूल राहिली नाही तर पाऊस ८६ टक्के राहू शकतो.
देशातील दुष्काळाच्या व्याख्येनुसार, जर पाऊस सरासरीपेक्षा १० टक्के कमी असेल व मैदानी भागातील २० टक्के भागात पावसाची २५ ते ५० टक्के कमतरता असल्यास देशात दुष्काळ मानतात. देशात अशी स्थिती १० वर्षांनंतर निर्माण होत आहे. २०१५ मध्ये मान्सून ८६ टक्के होता. दरम्यान, मान्सून केरळममध्ये धडकण्यास आणखी एक आठवडा लागू शकतो.

कमकुवत मान्सूनचा अर्थ… दुहेरी आव्हानही; डाळी-भाज्यांवर परिणाम, महागाईवर दबाव
१. शेतीसाठी चिंता: बहुतांश कृषी क्षेत्रांमध्ये कमी पाऊस शक्य. याचा खरीप पिके, विशेषतः भात, डाळी व तेलबियांची पेरणी, उत्पादनांवर परिणाम शक्य. २. महागाईवर दबाव : कमी मान्सूनचा थेट परिणाम भाज्या, डाळी व अन्नधान्याच्या उपलब्धतेवर होतो. अन्नधान्याची महागाई वाढण्याचा धोका राहील. हे आरबीआयच्या महागाई नियंत्रणाच्या उपायांसाठी आव्हान ठरू शकते. ३. वीजनिर्मितीवर परिणाम : कमी पावसामुळे जलाशयांमध्ये पाणी कमी जमा होईल. याचा परिणाम पिण्याचे पाणी, सिंचन, जलविद्युत निर्मितीवर शक्य. ४. उष्णतेचे दुहेरी संकट : ‘कमी पाऊस व अधिक उष्णता’ अशा दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. यामुळे आरोग्य, कामगारांची उत्पादकता, विजेची मागणी व पाणी टंचाई यांसारख्या समस्या वाढू शकतात.
जूनमध्ये पाऊस ९२% तर १२ राज्यांत उष्णतेच्या लाटेचे दिवस जास्त
आयएमडीने सांगितले की, या वर्षी मान्सूनच्या पहिल्या महिन्यात सरासरीच्या ९२ टक्केच पाऊस होईल. जूनमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यापेक्षा जास्त असतील.
- उत्तर पश्चिम : जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड, चंदीगड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, यूपी. 92% पेक्षा कमी
- पूर्व व ईशान्य : बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर पूर्वचे सर्व आठ राज्ये. 94% ते 106%मध्य आणि दक्षिण: गुजरात, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व केरळ. 94% पेक्षा कमी
- मान्सून कोअर झोन : राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र व गोवा. 94% पेक्षा कमी पाऊस शक्य.
महाराष्ट्रात ९४%, बिहार व ईशान्येकडे चांगला पाऊस शक्य
कमी पावसाच्या चिंतेमुळे सेन्सेक्स १०९२ अंकांनी घसरला : हवामान विभागाकडून कमकुवत मान्सूनचा अंदाज जाहीर होताच सेन्सेक्स १,०९२ अंकांनी घसरला. निफ्टी २३,५५० च्या खाली आला. निफ्टी ३५९ अंक (१.५%) घसरून २३,५४७ वर बंद झाला, तर सेन्सेक्स १,०९२ अंक घसरून ७४,७७५ वर बंद झाला.