![]()
स्थानिक नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश मुंदे तसेच प्रमुख अतिथी प्रा. डॉ. नितीन सराफ यांच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश मुंदे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत क्रीडाक्षेत्राचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्व विषद केले. नियमित खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी डॉ. नितीन सराफ यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर व भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देऊन क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले. यानंतर महाविद्यालयातील प्रा. डॉ. खुशाल अळसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील खेळाडू व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला. या कार्यक्रमाला डॉ. संगीता मालाणी, डॉ. एस. पी. बनसोड, डॉ. के. टी. मेहरे, डॉ. सतीश खोडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. खुशाल अळसपुरे यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविल्याबद्दल सर्व विद्यार्थी व खेळाडूंचे कौतुक केले आणि त्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Source link
नारायणराव राणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनी खेळांचे आयोजन