Headlines

मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:मराठा सेवा संघ 36 वा स्थापना दिन; शिक्षणासोबत सामाजिक जाणिवेची गरज- राऊत‎




आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळवून न थांबता महापुरुषांचे विचार आत्मसात करून सामाजिक भान व विवेक जपला पाहिजे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते अक्षय राऊत यांनी केले. मराठा सेवा संघाच्या ३६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जिजाऊ सांस्कृतिक भवनात सकल मराठा समाजातील दहावी, बारावी, सीईटी आणि नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तम तायडे होते. महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात ॲड. अनिल लव्हाळे यांनी सेवा संघाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शिवधर्म दिनदर्शिका देण्यात आली. या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष अरविंद गावंडे, बबनराव आवारे, अशोक पटोकार, सहआयुक्त मोहन गावंडे, प्रा. ओम खोटरे, प्रा. निलेश भुईभार आणि रेणू गावंडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पटोकार व अंजली ठाकरे यांनी केले. आभार जयदीप सोनखासकर यांनी मानले. डॉ. रणजीत कोरडे व संपूर्ण कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीने सोहळ्याच्या यशासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मराठा सेवा संघासह सर्व कक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हाध्यक्ष डॉ. रणजीत कोरडे व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजन समितीचे पंकज जायले, आनंद सूकळीकर, प्रा. संदीप निर्मळ, ॲड. अनिल लव्हाळे, अतुल अंधारे, प्रवीण चोपडे, अविनाश गावंडे, अविनाश पाटील, किरण देशमुख, दिवाकर ताले, अक्षय लहाने, अमोल पटोकार, भागवत टेकाडे, संजय इंगळे, अंजली ठाकरे, आशा अंधारे, ॲड. स्नेहा लव्हाळे, कार्यालयीन सचिव दिलीप देशमुख, विनोद साबळे आदींनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *