Headlines

व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साकडे:कृषी उत्पन्न बाजार समितीने केळी व्यापारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी‎




तालुक्यासह परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकाच्या विक्रीपासून ते कटाईपर्यंतच्या प्रश्नांमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. केळीच्या बाजारभावावर असलेले व्यापाऱ्यांचे नियंत्रण (बोर्ड) हा मुख्य मुद्दा आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाजार समितीच्या वतीने समन्वय बैठक घेण्यात आली. त्यावर तोडगा काढण्यासाठीही चर्चा झाली. विधानसभा क्षेत्राचे आ. गजानन लवटे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. जयंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे निवेदन दिले होते. यावेळी सभापती अॅड. जयंत साबळे यांनी शासनाच्या धोरणामुळे भाजीपाला व फळे नियमनमुक्त असल्याने बाहेरील होणाऱ्या सौद्यावर बाजार समितीचे नियंत्रण नाही. आ. लवटे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नियमनमुक्तीमुळे शेतकरी व व्यापारी यांच्या व्यवहारावर नियंत्रण नाही. हीच मुख्य समस्या आहे. या बैठकीला मतदारसंघाचे आ. लवटे, सभापती अॅड. साबळे, शेतकरी संघटनेचे गजानन दुधाट, न.प. सदस्य तथा केळी उत्पादक प्रवीण नेमाडे, उमेश भोंडे, आशिक अन्सारी, सुयोग खाडे, प्रदीप येवले (ता. अध्यक्ष, रा. काँ. श. प.), बाजार समिती संचालक शंकर चोरे, विकास येवले, सुरेश आडे, संजय काळमेघ, भुजंग कोकाटे, शे. जमील शे. रहमान, मो. सिद्दीक मो. सादिक, प्रदीप इंगळे, सागर घोगरे, व्यावसायिक कमलेश पटेल, सुधीर रसे, किसान ब्रिगेडचे कुलदीप मुरतकर, विनोद हागोणे यांच्यासह तालुक्यातील व परिसरातील केळी बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी केळी बागायतदार शेतकरी संघाचे तालुकाध्यक्ष अतुल खारोडे यांचे सहकार्य लाभले. उत्पादक अपेक्षित मोबदल्यापासून वंचित वेळेवर केळीची कटाई न होणे आणि बाजारातील व्यवहारांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची भावना उत्पादकांनी व्यक्त केली. व्यापाऱ्यांऐवजी त्यावर बाजार समितीने नियंत्रण ठेवावे. हा बैठकीचा मुख्य मुद्दा होता. यावेळी केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यात समोरासमोर चर्चा झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *