Headlines

सैनिक म्हणून केली देशसेवा; आता सैनिक परिवाराची जबाबदारी:कर्नल डॉ. सर्जेराव नागरे यांची जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी निवड; मदडगावात सत्कार‎



अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र कर्नल डॉ. सर्जेराव नागरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रतिष्ठेच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी – वर्ग १ पदावर निवड झाली. या निवडीबद्दल मदडगाव (ता. अहिल्यानगर) ग्रामस्थ व त्रिदल माजी सैनिक संघटनेतर्फे रविवारी त

.

कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवान नारायण गोविंद शेडाळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी मदडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच साहेबराव शेडाळे, सदस्य संदीप काळे, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नितीन सुंबे, माजी सरपंच श्रीधर शेडाळे, मनोज काळे, माजी उपसरपंच आकाश आठरे उपस्थित होते.

त्रिदल माजी सैनिक संघटनेचे मदडगाव अध्यक्ष सुभेदार बाळासाहेब येरकळ, सचिव सुभेदार पांडुरंग आठरे, अहिल्यानगर त्रिदल माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय म्हस्के, दौलावडगावचे सुभेदार संजय फसले, सुभेदार अश्वत्थमा ढवळे, माजी सैनिक सुदाम काळे, भीमाजी काळे, सुभेदार अर्जुन कांबळे, भानुदास शिंदे, संतोष गायकवाड,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. एन. शिंदे उपस्थित होते.

सरपंच साहेबराव शेडाळे म्हणाले, पदभार स्वीकारल्यापासून गावातील कोणत्याही नागरिकाची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली गेलेली नाही. गाव तंटामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात आजी-माजी सैनिकांचा योग्य सन्मान राखला जातो. त्रिदल माजी सैनिक संघटना आजी-माजी सैनिकांचे वैयक्तिक प्रश्न प्रशासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम सामाजिक बांधिलकीतून निस्वार्थपणे करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनच्या महिला अध्यक्षा डॉ. अर्चना आघाव-नागरे यांच्या हस्ते वीरपत्नी सुगंदाबाई डांगे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. आघाव-नागरे यांनी ग्रामीण भागातील मुलींमध्ये मोठी प्रतिभा असून, भारतीय सैन्यदलासह अग्निपथ योजना, वनविभाग, पोलिस दल व अर्धसैनिक दलात त्यांच्यासाठी संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

मुलींनी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि स्पर्धा परीक्षेचा सातत्याने अभ्यास करावा. जिद्द, चिकाटी आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घेतल्यास यश निश्चित मिळते, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सत्काराला उत्तर देताना कर्नल डॉ. नागरे म्हणाले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे जबाबदारीचे पद असून, माजी सैनिकांचे कल्याण व पुनर्वसनासाठी आपण कटिबद्ध राहू. सैनिक परिवारासाठी शासनाच्या विविध आर्थिक योजना, अनुदान, पाल्यांना शिष्यवृत्ती, फॅमिली पेन्शन, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना मिळणारा सन्मान निधी यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सैनिकांचे शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

सैनिक परिवारासाठी कटिबद्ध : डॉ. नागरे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *