![]()
खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य नैसर्गिक घटकांमुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्यातील ट्रिगर १ अंतर्गत आठ तालुके व ट्रिगर २ अंतर्गत २ तालुके अशा एकूण १० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या तालुक्यांमध्ये पंचनामे सुरु असून ट्रिगर १ अंतर्गत ८ तालुक्यातील ८५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमध्ये ट्रिगर १ व आंबेगाव, जुन्नर मध्ये ट्रिगर २ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. ८ तालुक्यातील ३,०८,९५४ हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ६१ हजार ३१४ हेक्टर क्षेत्रावरील ४ लाख ८६ हजार १८९ खातेदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारीनुसार भोर १२ हजार ९२६, वेल्हा ४ हजार ८२२, खेड ३९ हजार १२९ शिरूर ३० हजार ११०, बारामती ५२ हजार १३०, इंदापूर ४८ हजार ९८९, दौंड ३९ हजार ९९७ आणि पुरंदर ३३ हजार २११ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील २५ टक्के पंचनामे पूर्ण, पंचनाम्याचे काम गतीने सुरू दुसऱ्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील २५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून आंबेगाव तालुक्यातील ५ हजार २१७ खातेदारांचे १ हजार १०७ हेक्टर क्षेत्रावरील तर जुन्नर तालुक्यातील १२ हजार ९७ खातेदारांचे ८ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ————— हेही वाचा.. उद्धव ठाकरेंचा भगव्याशी संबंध राहिलेला नाही: गिरीश महाजनांचा हल्लाबोल, म्हणाले- कुंभमेळ्यात AI सुरक्षेचा वापर करणार
“जेव्हा तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हाच तुम्ही विचार सोडले. त्यामुळे तुमच्याकडे आता भगवा शिल्लकच राहिलेला नाही, अशा आक्रमक शब्दांत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, आगामी कुंभमेळ्याची तयारी, लॉरेन्स बिश्नोई प्रकरण आणि मनोज जरांगे यांनी केलेले ५०० कोटींचे आरोप या सर्वच मुद्द्यांवर महाजन यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले. सविस्तर वाचा
Source link
पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांत दुष्काळ जाहीर:8 तालुक्यांत पंचनामे 85 टक्के पूर्ण, आंबेगाव-जुन्नरमध्ये 25 टक्के पंचनामे