![]()
निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुप, मोठी उमरी, अकोला यांच्या वतीने चाचोंडी रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. केवळ वृक्षारोपण करून आपली जबाबदारी संपत नाही. लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन व संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढते प्रदूषण, बदलते हवामान, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आज लावलेले एक झाड भावी पिढीसाठी निसर्गाची अमूल्य भेट आहे. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा, असे मत प्रा. डॉ. रवींद्र ढोरे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती, वाढते प्रदूषण कमी करणे, भावी पिढीसाठी निसर्गाचे संरक्षण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. “वृक्ष लावा, वृक्ष जगवा, पर्यावरण वाचवा” हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांची नियमित निगा व संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला. या कार्यक्रमास मनोहर कराळे, श्रीकृष्ण कथलकर, मेजर प्रल्हाद शिंदे, संदीप पाटील, दिगंबर असोलकर, जगदेव वानेटकर, राजेश गोरले, रामदास भाकरे, दत्तात्रय सोनोने, उपाध्ये साहेब, रवी अठराळे, संजय लामतुरे, उमेश उंबरकर, सुधाकर नवखेडे, गणेश साबळे, विलास वानखडे, पंजाबराव नेरकर, गणेश गाडेकर, एकनाथ वसू, नामदेव असोलकर, श्रीकृष्ण डांबेलकर, रमेश लोखंडे, देविदास नेरकर, दिनेश दुतोंडे, राजेश ठाकरे, अमोल वाघमारे, अनिल वाघ, अमरसिंग गाळे, जुबळे, मेजर इंगळे, मनोज बोबडे, अनिल मदणकर, अरुण भिवसणे, दादाराव उबाळे, विष्णू मुरूमकार, प्रफुल्ल पल्हाडे, अशोक इंगळे, मोहोकार, गणेश गावंडे, राम सांगोळे, निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या महिला सदस्यांनी सहकार्य केले.
Source link
निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुप वृक्षारोपणच्या वतीने कार्यक्रम:वृक्षारोपणासह वृक्षांचे संगोपन अन् संवर्धन करणे महत्त्वाचे- डॉ. प्रा. ढोरे