Headlines

सार्शी येथील प्रवेशद्वारासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा:वंचितच्या जिल्हा महासचिवांना अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारला, तहसीलच्या पायऱ्यावर बसून प्रशासनाचा निषेध‎



पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सार्शी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार निर्माण करण्याच्या मुद्द्यावर सोमवार ३१ रोजी तहसील कार्यालयात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंदोलनाची भूमिका घेणारे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासच

.

त्यामुळे काही ग्रामस्थांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणा देत निषेध नोंदविला.

२५ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नव्हती. त्यामुळे बौद्ध बांधवांच्या वतीने रात्री १० वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्याशी तिवसा तहसीलदारांनी सदर प्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी दोन्ही अर्जदार प्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काल प्रवेशद्वाराची मागणी करणाऱ्या दोन्ही गटांसह आंदोलनकर्ते सागर भवते यांनाच तहसीलदारांनी बैठकीत प्रवेश नाकारला.

त्यामुळे या कृत्याचा निषेध करत बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला. प्रवेशद्वार प्रकरणी आंदोलक तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्यासह समस्त बौद्ध बांधव यांच्याशी तालुका प्रशासनाने चर्चा करावी. चर्चा झाल्याशिवाय या प्रकरणी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी भूमिका सार्शी येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. ग्रामपंचायत प्रशासन यामध्ये काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून आहे.

…म्हणून बहिष्कार टाकला प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावर आंदोलनादरम्यान तिवसा तहसीलदारांनी बैठक घेऊन चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. तहसीलदारांनी एका विशिष्ट समूहाच्या मागणीचे समर्थन केले. त्यामुळे आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चेशिवाय निर्णय घेऊ नये. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास प्रशासन जबाबदार असेल. – सागर भवते, जिल्हा महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *