Headlines

Sengaon Kolsha College Assault Case; President Booked For Attacking Parent


सेनगाव तालु्क्यातील कोळसा येथे बी फार्मसी महाविद्यालयात मुलीची टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संस्थाध्यक्षासह तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १३ गुन्हा दाखल झाला आहे.

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालु्क्यातील पोटा येथील गजानन जाधव यांची मुलगी अंजली ही सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर बी फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेते. मागील वर्षी मुलगी प्रथम वर्षाला होती. मात्र त्यानंतर मुलीची शिक्षण घेण्याची मनःस्थिती नसल्याचे तिने सांगितले होते. त्यावरून गजानन जाधव हे मुलगी अंजली हिची टीसी काढण्यासाठी शुक्रवारी ता. १० महाविद्यालयात गेले होते.

यावेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यास मुलगी अंजली हिची टीसी देण्याची मागणी केली. मात्र कर्मचाऱ्याने संस्थेचे पदाधिकारी येऊ द्या त्यानंतरच टीसी देतो असे सांगितले. त्यानंतर संस्थाध्यक्ष भास्कर बेंगाळ तेथे आले. त्यांच्याकडे टीसीची मागणी केली असता, त्यांनी शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधी आमच्या परिचयाचे असून तुला गोळी घालील, अशी धमकी दिली. त्यानंतर मनोहर बेंगाळ येथे आला. त्याने गालात चापटा मारून बाहेर काढून दिले. तसेच अभिषेक बेंगाळ याने लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत गजानन जाधव जखमी झाले.

याप्रकरणी गजानन जाधव यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भास्कर बेंगाळ, मनोहर बेंगाळ, अभिषेक बेंगाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार राजू जाधव, सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहे.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

या संस्थेमध्ये टीसी मागण्यासाठी गेलेल्या गजानन जाधव यांना मारहाण व शिवीगाळ झाल्याचे व्हिडीओ देखील समाज माध्यमातून व्हायरल झाला असून यामध्ये जाधव यांना शिवीगाळ केली जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर संस्थेकडून विद्यार्थीनीला पास करून देण्याची हमी घेण्यात आल्याचेही दिसून येत आहे. दिव्य मराठी या व्हिडीओची पुष्टी करीत नाही.

हे ही वाचा…

हिंगोलीत काळाचा घाला:कयाधू नदीपात्रात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत

हिंगोली तालु्क्यातील घोटा शिवारात कयाधू नदीच्या पात्रात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची घटना रविवारी ता. 12 रात्री उघडकीस आली आहे. दोघांवर शोकाकुल वातावरणात घोटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेमुळे घोटा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. सविस्तर वाचा…

सेनगावमध्ये वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला:जमादाराला दगडाने मारून जखमी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

सेनगाव पोलिस ठाण्याच्या ह्द्दीमध्ये गणेशपूर ते हत्ता रोडवर वाहनांची तपासणी करणाऱ्या जमादारावर हल्ला करून जखमी करणाऱ्या चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. 12 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने पथके स्थापन करून दोघांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.