‘चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेकडं चल गं माझ्या सखी…’,:केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या मुलींची व्यथा निबंध स्वरूपात मांडण्याचा हा प्रयोग
माझ्या शाळेचा रस्ता म्हणजे केवळ एक पाऊलवाट नसून, माझ्या स्वप्नांचा आणि रोजच्या संघर्षाचा एक चिखलमय प्रवास आहे. जेव्हा उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुट्या होत्या, तेव्हा आमची मनपा शांत बसली. पण जसा पावसाळा लागला आणि शाळा सुरू झाली, तसे मनपाने आमच्या केडगाव उपनगरात रस्त्याचे काम हाती घेतले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता काँक्रिटसाठी खोदून ठेवला….