![]()
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, २८ जून रोजी सिव्हिल लाईन परिसरातील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडणार आहे. या नागरी सत्कार सोहळ्यात विदर्भाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आठ पद्मश्री पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये शंकर बाबा पापळकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. विलास डांगरे, डॉ. परशुराम खुणे, सत्यनारायण नुवाल आणि जनार्दनपंत बोथे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. बैठकीला प्र-कुलगुरु डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांच्यासह सत्कार समितीचे सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या नागरी सत्कार समारंभाची संपूर्ण रूपरेषा ठरवण्यासाठी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत अजय अग्रवाल, डॉ. राजेश भोयर, विष्णू चांगदे, डॉ. योगेश भूते, डॉ. अजय चव्हाण, डॉ. श्रीकांत भोवते, डॉ. चंदू पोपटकर, दिनेश शेराम, सुनिल फुडके, राहुल हनवते, तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. संभाजी भोसले आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांचा समावेश आहे.
Source link
नागपूर विद्यापीठातर्फे विदर्भातील पद्मश्रींचा नागरी सत्कार:28 जून रोजी देशपांडे सभागृहात विशेष सोहळा