बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू:आईच्या कुशीतून ओढून नेले; भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना, १५ एप्रिल रोजी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. विर्शी शेतशिवारात ही घटना घडली. आशिका काशिनाथ मिरी (वय ५) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती छत्तीसगडमधील बलोदा (बाजार) जिल्ह्यातील सुहेला गावची रहिवासी होती आणि तिचे कुटुंब विर्शी येथे विटाभट्टीवर कामासाठी आले होते. बुधवारी…