महाराष्ट्र उष्णतेने होरपळला:देगलूरच्या सुंदगीत देशातील उच्चांकी 47 अंश तापमानाची नोंद; अकोल्याचा पारा 44.2 अंशांवर
राज्यात उन्हाचा कडाका आता दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुंदगी गावात आज चक्क ४७ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. या तापमानासह सुंदगी हे आज देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. दुसरीकडे, विदर्भातील अकोला आणि अमरावतीतही सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून जनजीवनावर…