अमरावतीच्या तापमामात 24 तासांत पुन्हा वाढ, पारा 44 अंश पार:विदर्भात उष्णतेची लाट, पुढील काही दिवस 47 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
अमरावतीमध्ये बुधवारी तापमानाने पुन्हा एकदा ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. मंगळवारी शहराचे तापमान ४३.८ अंश सेल्सिअस होते. गेल्या २४ तासांत तापमानात ०.२ अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे अमरावतीकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना उन्हामुळे त्रास सहन करावा लागला, तर दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसू लागले. हवामान खात्याने…