![]()
अमरावती युवक काँग्रेसने भारत-अमेरिका व्यापार करार (ट्रेड डील) रद्द करण्याची मागणी केली आहे. हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक ठरू शकतो, असा दावा युवक काँग्रेसने केला आहे. या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू असून, बुधवारी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. केंद्र शासनाने लागू केलेला इंडो-यूएस ट्रेड डील शेतकरीविरोधी असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. या कराराच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या मागणीसाठी देशभरात साखळी सत्याग्रह सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्हा युवक काँग्रेसने काँग्रेस भवनासमोर सात दिवस निदर्शने केली. त्यानंतर बुधवारी काँग्रेस भवन आणि नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, मेळघाट विधानसभा अध्यक्ष पीयूष मालवीय, चिखलदरा तालुका अध्यक्ष संदीप मुंढे, तसेच राजेंद्र कासदेकर, धनराज आठवले, पंकज अमोदे, अक्षय घुमावरे, चिंटू झाड़खंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Source link
युवक काँग्रेसची भारत-अमेरिका ट्रेड डील रद्द करण्याची मागणी:अमरावतीत काँग्रेस भवनसमोर निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन