![]()
तिवसा येथील राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णाजी पेट्रोल पंपालगत बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाशेजारील डीपीजवळ स्पार्किंग झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्षातून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिवसा ते मोझरी महामार्गावरील कृष्णाजी पेट्रोलियम शेजारील डीपीजवळ गेल्या अनेक दिवसांपासून स्पार्किंग होत होते. संबंधित डीपीवरील डिओ ‘ऑटोमॅटिक’ असल्याने त्या ठिकाणी वारंवार हालचाल होत असते. याच ठिकाणी जिवंत विद्युत वाहिन्या जमिनीवर लोंबकळत असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. या गंभीर बाबीसंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून त्यांना जाणीव करून देण्यात आली होती. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याची घटना घडली.
Source link
डीपीजवळ स्पार्किंगमुळे पेट्रोल पंपाशेजारी आग:मोठी दुर्घटना टळली, तिवसा येथील घटना; तीन दिवसांपासून सुरू होते स्पार्किंग