Headlines

अमरावतीच्या तापमामात 24 तासांत पुन्हा वाढ, पारा 44 अंश पार:विदर्भात उष्णतेची लाट, पुढील काही दिवस 47 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता




अमरावतीमध्ये बुधवारी तापमानाने पुन्हा एकदा ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. मंगळवारी शहराचे तापमान ४३.८ अंश सेल्सिअस होते. गेल्या २४ तासांत तापमानात ०.२ अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे अमरावतीकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना उन्हामुळे त्रास सहन करावा लागला, तर दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसू लागले. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी राज्यभर उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमान आणखी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर, नजीकच्या वर्धा जिल्ह्याने शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, अमरावतीमध्ये सध्या अशी कोणतीही स्थिती नाही. हवामानतज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील चार-पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्यांच्या मते, २० एप्रिलनंतरच तापमानात थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *