Headlines

महाराष्ट्र भाजपचे मिशन बंगाल सुरू:मुंबईहून पश्चिम बंगालकडे विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय; 7 हजार मतदारांना पोहोचवण्याचे नियोजन

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती अधिक आक्रमक केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला आव्हान देण्यासाठी मिशन बंगाल, राबवले जात असून, त्यात आता महाराष्ट्र भाजपही सक्रिय झाले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मुंबईहून पश्चिम बंगालकडे विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 17 एप्रिल रोजी…

Read More

UPSC Talent Bridge on MPSC Jobs

राज्य सरकारने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी निपुण सेतू उपक्रम राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत उमेदवारांनी एकदा एमपीएससी परीक्षा दिल्यानंतर त्यांना पुन्हा नोकरीसाठी परीक्षा देण्याची काहीही ग . राज्यातील असंख्य तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगी (यूपीएससी) व राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत शासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. एका प्रयत्नात…

Read More

चाकणकर, खरातच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार?:अदिती तटकरे महिला नेत्या म्हणून सक्षम आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले भोंदू अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर काल शिर्डी पोलिस ठाण्यात जाऊन आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला नोटीसच आली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अद्यापही रूपाली चाकणकर यांना अटक करण्यासाठी पत्र व्यवहार झालेला नाही,…

Read More

'एकनाथ शिंदे आले आणि म्हणाले एके ठिकाणी जायचेय..':मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला खरातच्या भेटी मागचा किस्सा

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरात भेटीबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले असून, हा सर्व प्रकार केवळ अज्ञानातून आणि दीपक केसरकर यांच्या आग्रहामुळे घडल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा शिर्डीला आले होते, तेव्हा त्यांना खरातच्या पार्श्वभूमीबद्दल कोणतीही कल्पना नव्हती, असे विखे पाटलांनी सांगितले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले…

Read More

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश:सक्षम नेतृत्व देणे आवश्यक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीबाबत परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडत तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व…

Read More

पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून:आधी गोळीबार, मग कोयत्याने वार करून संपवले; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. गौरव गणेश तेलंगी (वय १८, रा. बिंडसर वस्ती, नऱ्हे, मूळ रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे….

Read More

38 वर्षीय व्यक्तीवर गॅस्ट्रिक व्हेरिसेसवर यशस्वी उपचार:मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रणव वंजारींकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रणव वंजारी यांनी 38 वर्षीय रुग्णावर गॅस्ट्रिक व्हेरिसेस या गंभीर आजारावर यशस्वीपणे अत्याधुनिक उपचार केले आहेत. परभणी येथील या रुग्णाला यकृताच्या आजारामुळे ही समस्या उद्भवली होती. गॅस्ट्रिक व्हेरिसेस ही पोर्टल हायपरटेन्शनमुळे उद्भवणारी एक गंभीर स्थिती आहे. यामध्ये पोटातील रक्तवाहिन्या फुगतात आणि फुटल्यास जीवघेणा रक्तस्राव होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्वरित…

Read More

सिंबायोसिसतर्फे 'सिमहेलथ 2026' परिषदेचे आयोजन:देश-विदेशातील तज्ज्ञ आरोग्य क्षेत्रातील बदलांवर चर्चा करणार

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) तर्फे ‘सिमहेलथ २०२६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातील नवनवीन संशोधन, तंत्रज्ञान आणि भविष्यातील आव्हानांवर या परिषदेत मंथन होणार आहे. सिंबायोसिसच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या परिषदेला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामुळे परिषदेत सहभागी होणाऱ्या डॉक्टरांना…

Read More

नाशिकनंतर संगमनेरमध्ये भोंदूबाबा:मंत्रांच्या उच्चाराने आजार बरे करण्याचा दावा, 50 हजारांपर्यंतचे डोनशेन घेतले; कारवाईची मागणी

नाशिकच्या अशोक खरातने मांडलेल्या भोंदूगिरीच्या खेळाचा तपास सुरू असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून अशाच एका लुटारू बाबाचा प्रताप उघडकीस आला आहे. मंत्रांच्या जोरावर शारीरिक व्याधी दूर करण्याचा दावा संगमनेरच्या कोल्हेवाडी येथील ‘दत्तधाम’मधील एक बाबा करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्वतःला ‘गडगे महाराज’ म्हणवणारा हा व्यक्ती मूळचा गवंडी असून, सिमेंटच्या टाक्या बनवण्याच्या…

Read More

सीएमआयए-एमआयटीचा संयुक्त कौशल्य विकास उपक्रम सुरू:16 एप्रिल रोजी ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन’ सत्राने होणार शुभारंभ

मराठवाड्यातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) आणि एमआयटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ १६ एप्रिल रोजी ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन’ प्रशिक्षण सत्राने होणार आहे. सीएमआयए आणि एमआयटी यांच्यात नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला…

Read More