अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी:SIT आता चौथ्या गुन्ह्यात घेणार ताबा; भोंदू खरात आज कोर्टापुढे हात जोडून उभा राहिला
महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातला आज कोर्टाने 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने त्याच्यावर दाखल तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ही कोठडी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली…