अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि धुसफूस आता उघडपणे चव्हाट्यावर येऊ लागली आहे. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रदेशाध्यक्ष ब
.
सुनेत्रा वहिनींना स्वतःच्या दुःखात शांत बसण्याचीही वेळ मिळाली नाही
उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाचा आणि पक्षाच्या सद्य:स्थितीचा अत्यंत हळवा आणि वास्तववादी वेध घेतला आहे. “दादांच्या अचानक जाण्याने केवळ महाराष्ट्राने एक मोठा लोकनेता गमावला नाही, तर एका कुटुंबाचे आयुष्य एका क्षणात 360 अंश बदलले. विशेषतः सुनेत्रा वहिनींना तर स्वतःच्या दुःखात शांत बसण्याची उसंतही मिळाली नाही. त्यांना मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही. डोळ्यांतील अश्रू पुसण्याआधीच त्यांच्या खांद्यावर पक्षाची आणि सरकारची प्रचंड मोठी जबाबदारी येऊन पडली.”
पाठिशी उभे राहण्याऐवजी संभ्रमाचे वातावरण
“अशा अत्यंत कठीण आणि कसोटीच्या प्रसंगी दादांवर प्रेम असल्याचा दावा करणाऱ्या प्रत्येकाने वहिनींच्या पाठीशी छातीचा कोट करून उभे राहायला हवे होते. मात्र, दुर्दैवाने वहिनींचे अश्रू सुकण्याआधीच पक्षाबद्दल, नेतृत्वाबद्दल संशय निर्माण करणाऱ्या बातम्या माध्यमांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने पेरल्या जात आहेत. आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न केवळ विरोधकांच्या पथ्यावर पडणारा आहे.”
बसलेल्या फांदीवरच कुऱ्हाड चालवू नका
“दादांनी आयुष्यभर कष्ट करून उभारलेल्या पक्षाच्या फांदीवर बसून त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात कोणाचेही राजकीय भले होणार नाही. आज दादा असते तर त्यांनी एकच विचारले असते— ‘मी गेल्यानंतर माझ्या माणसांना जपले की त्यांना एकटे पाडले?'”
रुपाली ठोंबरेंच्या आरोपांना उत्तर
उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही थेट नाव न घेतल्यामुळे पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी ‘उमेश पाटील वरिष्ठ नेत्यांना घाबरले’ असा आरोप केला होता. या आरोपांना प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “उमेश पाटील कोणाच्याही बापाला घाबरत नाही. मी निडर अजितदादांचा कार्यकर्ता असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा आहे. महाराष्ट्रातील प्रस्थापितांना शिंगावर घेण्याची माझी धमक आहे. माझी पोस्ट कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून संपूर्ण प्रवृत्तीविरोधात आहे.”
25 लाखांचा जनसागर ही दादांची ताकद
“दादांच्या अंत्यविधीला 25 लाखांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते, यावरून ते किती मोठे लोकनेते होते हे देशाला समजले. अशा लोकनेत्याच्या परिवाराला आणि एका महिला नेतृत्वाला टार्गेट करून मानसिक त्रास देणे अत्यंत दुर्दैवी आहे.”
पक्ष ताब्यात घेण्याच्या संघर्षाला नवे वळण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पवार कुटुंब यांच्यातील समन्वयावरून विविध चर्चा सुरू आहेत. रूपाली ठोंबरे यांनी यापूर्वीच जगदंबेची शपथ घेऊन “अजितदादांना प्रदेशाध्यक्ष बदलायचाच होता” असा दावा करत तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आता उमेश पाटील यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर नैतिक प्रश्न उपस्थित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा अंतर्गत कलह अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा…
जगदंबेची शपथ घेऊन सांगते, अजितदादांना प्रदेशाध्यक्ष बदलायचाच होता!: रूपाली ठोंबरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठा अंतर्गत राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा’ थेट सल्ला दिला आहे. प्रशांत किशोर यांच्या या सल्ल्यानंतर पक्षातील जुना वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “मी कुलदैवत जगदंबा मातेची शपथ घेऊन सांगते, प्रदेशाध्यक्ष बदलावा ही स्वतः अजितदादांचीच तीव्र इच्छा होती आणि ते अजितदादांचे स्वप्न होते,” असा मोठा बॉम्ब रूपाली ठोंबरे यांनी टाकला आहे. प्रसारमाध्यमांशी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना रूपाली पाटील ठोंबरे यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यपद्धतीवर थेट ताशेरे ओढले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना प्रशांत किशोर यांचा थेट अल्टीमेटम, राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण

अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी