Headlines

हिंगोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा:1.86 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा दाखल




हिंगोली तालु्क्यातील संतुकपिंपरी शिवारात जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन दुचाकी, पाच मोबाईलसह १.८६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांवर शनिवारी ता. ८ पहाटे हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयातील अवैधव्यवसाय रोखण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून अवैध व्यवसायाची माहिती घेत कारवाई केली जात आहे. दरम्यान, हिंगोली तालुक्यातील संतुकपिंपरी शिवारात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार संदीप जाधव, सुभाष घुगे, कोंडबा मगरे, विकी कुंदनानी, नितीन गोरे, धनंजय क्षिरसागर, साईनाथ कंठे यांच्या पथकाने शुक्रवारी ता. ७ रात्री पावनेदहा वाजण्याच्या सुमारास साध्या वेशात जाऊन छापा टाकला. यामध्ये घटनास्थळावर चौघे जण जुगार खेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून दोन दुचाकी, पाच मोबाईल, २२ हजार रुपये रोख असा सुमारे १.८६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार संदीप जाधव यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी राहुल पंडीत, गौतम काशिदे, (रा. हिवरा जाटू), शंकर काचगुंडे (रा. अंजनवाडा), सुरेश मुकाडे (रा. संतुकपिंपरी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार असलम गारवे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *