Headlines

रुग्णालयाबाहेर पापाराझींवर सलमान खान संतापला:इशारा देत म्हणाला, "मी 60 वर्षांचा झालो आहे, पण लढायला विसरलेलो नाही"

मंगळवारी सलमान खानने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये एका जवळच्या मित्राला भेट दिली, जिथे तो पापाराझींवर संतापल्याचे वृत्त आहे. हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो रागाने ताकीद देताना दिसत आहे. त्यानंतर लगेचच, सलमान खानने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि वयाच्या ६० व्या वर्षीही आपण लढायला विसरलेलो नाही, असा इशारा…

Read More

नांदगाव खंडेश्वरमध्ये 271 युवकांना मिळाली नोकरी:द ग्रॅज्युएट फाउंडेशनने आयोजित केला रोजगार महोत्सव, 122 जणांना नियुक्तीपत्रे

नांदगाव खंडेश्वर येथे द ग्रॅज्युएट फाउंडेशनने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात २७१ सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यापैकी १२२ उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, तर उर्वरित उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे पाठवली जातील. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित…

Read More

सतीश शाह यांचे पिंडदान 'साराभाई'च्या कलाकारांनी केले होते:राजेश कुमारने सांगितले- निःसंतान असल्यामुळे गया येथे संपूर्ण संघाने परंपरा पाळली

अभिनेता राजेश कुमार यांनी नुकतेच सांगितले की, दिवंगत अभिनेते सतीश शाह यांच्यासाठी टीव्ही शो ‘साराभाई वर्सेस साराभाई’ च्या संपूर्ण कलाकारांनी गया येथे पिंडदान केले होते, कारण त्यांना कोणतीही संतती नव्हती. राजेश कुमार यांनी ‘बॉलिवूड बबल’शी बोलताना सतीश शाह यांना खूप उत्साही आणि सकारात्मक व्यक्ती म्हटले. ते म्हणाले की, गंभीर आरोग्य समस्या असूनही, त्यांनी कधीही आपल्या…

Read More

रांजणगाव महागणपती मंदिर 3 महिने बंद राहणार:जतन व संवर्धन कामांमुळे 15 एप्रिल ते 31जुलै 2026 पर्यंत भाविकांना प्रवेश नाही

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कामे अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निधीतून हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागामार्फत ही दुरुस्ती व संवर्धनाची कामे मागील तीन महिन्यांपासून…

Read More

सोलापुरात सीसीटीव्हीवर कापड टाकून दोरखंडाने एटीएम मशीन ओढले:गाडीत घालून नेले, हैदराबाद रस्त्यावरील सग्गम नगर रस्त्यावर पहाटे तीनची घटना

जुना विडी घरकुल पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सग्गम नगरातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन दोर बांधून कारने बाहेर ओढले. त्यानंतर 300 किलो वजनाचे हे मशीन घेऊन पसार झाल्याची घटना घडली. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. मशीन फोडत असल्याची माहिती बँकेच्या नियंत्रण कक्षाला मिळताच, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रमोद वाघमारे यांना फोन केला. त्यानंतर पोलिस…

Read More

देवस्थान इनाम जमिनींवर सरकारचा मोठा निर्णय:देवस्थानांचे हक्क अबाधित ठेवणार; बावनकुळेंची घोषणा, नवा कायदा डिसेंबरमध्ये

राज्यातील देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची घोषणा करत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यात सुमारे 5.5 लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनी असून या जमिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून विविध देवस्थानांना देण्यात आल्या होत्या. मात्र कालांतराने…

Read More

AIADMK मध्ये फूट, बंडखोर गटाचा TVKला पाठिंबा:षण्मुगम म्हणाले- जनादेश विजयसोबत, आम्ही DMK मध्ये सामील झालो असतो तर संपलो असतो

तामिळनाडूमध्ये AIADMK पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. पक्षाचे नेते सी.व्ही. षणमुगम यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळगम’ (TVK) या पक्षाला पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत ३० आमदारांनीही विजय यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले असल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी सकाळी षणमुगम यांनी निवेदन दिले, ‘आम्ही जनतेचा जनादेश स्वीकारतो. हा जनादेश TVK साठी…

Read More

'गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार':जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू निलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधान केल्याचा…

Read More

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर पोहोचले:पंतप्रधान मोदी आणि जयशंकर यांना भेटतील, क्वाड परिषदेतही सहभागी होतील

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर पोहोचले आहेत. ते सकाळी कोलकाता येथे पोहोचले. हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्याला भारत आणि अमेरिकेच्या संबंधांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जात आहे. कोलकाता येथील त्यांच्या कार्यक्रमादरम्यान मार्को रुबियो मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक मदर तेरेसा यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतील. याव्यतिरिक्त, ते…

Read More

वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 24.24 लाखांचा मुद्देमाल जप्त:हिंगोलीच्या मकोडी शिवारातील घटना, तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील मकोडी शिवारात सेनगाव पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 24.24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. 5 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाभरात अवैधवाळू उपसा व वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस दलाची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. पोलिस अधिक्षक डॉ….

Read More