बार्शीटाकळी येथे नागरी वस्तीमधून 800 लिटर अवैध डिझेल साठा जप्त:राज्य अन्न आयोग सदस्या व पुरवठा विभागाचा छापा
शहरातील इंदिरा आवास भागात गुरुवारी प्रशासनाने एक मोठी कारवाई करत नागरी वस्तीत साठवलेले सुमारे ८०० लिटर अवैध डिझेल जप्त केले आहे. राज्य अन्न आयोगाच्या सदस्य आणि तालुका पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हा छापा टाकला. दाट लोकवस्ती असलेल्या भागात अशा अत्यंत ज्वलनशील पदार्थाचा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गु्प्त माहितीवरून प्रशासनाने ही कारवाई केली. मिळालेल्या…