लिगो इंडियाच्या अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ:लिगो इंडियामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार – डॉ. मोहंती
हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लिगो इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादन अणु ऊर्जा आयोगाचे सचिव तथा परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी दुघाळा (ता. औढा नागनाथ) येथे केले. दुधाळा येथील लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी (सिव्हिल) व पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन आज…