![]()
वाळूज परिसरातील एक लघुउद्योजक बुधवारी (22 एप्रिल) सकाळी देवपूजा आटोपून कारखान्यात निघून गेले आणि त्यांच्या घरात शिरलेल्या प्रेयसीने त्यांच्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. झटापट होताच आरोपीने डोळ्यावर स्प्रे फवारून हा खून केला. साधना महेंद्र सोनपेठकर (38, रा. साईश्रद्धा पार्क, वडगाव कोल्हाटी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शैला सुनील सोनार ( 44, रा. बजाजनगर) हिला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोनपेठकर हे वाळूज भागात उद्योग चालवतात. आरोपी शैला सोनारने त्यांच्या घरात शिरताच दाराला आतून कुलूप लावले व पिस्तूल काढले. या वेळी साधना यांना वाचवण्यासाठी सासू केशरबाई सरसावल्या. त्यांनी शैलाचे पिस्तूल हिसकावून खिडकीबाहेर फेकले. मात्र, शैलाने त्यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून नंतर साधना यांच्यावर वार केले. उद्योजकाला 16 वर्षे त्रास महेंद्र आणि शैला यांची ओळख 2009 मध्ये एका कंपनीत झाली होती. आरोपी शैलाने महेंद्रला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन आतापर्यंत 36 लाख उकळल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. महिनाभरापूर्वी शैला जबरदस्तीने महेंद्रच्या घरी राहायला आली, तेव्हा पोलिसांनी तिला बाहेर काढले होते. खुनानंतर रचला फाशीचा बनाव हत्येनंतर शैला एक तास घरातच होती. तिने बाथरूममध्ये रक्ताने माखलेले हात आणि चाकू धुतला. काही घडलेच नाही अशा थाटात ती फोनवर बोलत बसली. केशरबाईंच्या ओरडण्यामुळे नागरिक जमा झाले. पोलिस येणार असल्याचे समजताच शैलाने फाशी घेण्याचा बनाव रचला. पोलिसांनी सब्बलच्या साह्याने दरवाजा तोडला आणि शैलाला ताब्यात घेतले. ‘आई वाचवा… आई वाचवा…’ म्हणत होती, पण मी हतबल होते सकाळी माझा मुलगा महेंद्र देवपूजा आटोपून कारखान्यात गेल्यावर शैला आली. तिनं सोबत कुलूप आणलं होतं. घरात येताच तिनं दाराला आतून कुलूप लावलं. मी विचारलं, “हे काय करतेस?’ तर तिने सरळ पर्समधून पिस्तूल काढलं. सून साधना घाबरली, तिने महेंद्रला फोन लावला. पण शैला चवताळली होती. मी हिंमत केली आणि झडप घालून ते पिस्तूल हिसकावून खिडकीबाहेर फेकलं. मला वाटलं आता आम्ही वाचू, पण त्या राक्षसिणीनं डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच आमच्या तोंडावर काहीतरी फवारलं. समोर सगळं अंधारून आलं. त्या वेळी मला साधनाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. साधना रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती, “आई वाचवा… आई वाचवा…” म्हणत होती…
Source link
वडगाव कोल्हाटीत थरार:सासूने पिस्तूल हिसकावून खिडकीबाहेर फेकल्यावर आरोपीने सुनेचा गळा चिरला, घरात शिरून महिलेने आतून कुलूप लावून केला खून