नाशिक विधान परिषद निवडणूक:जागावाटपाआधीच भाजपकडून गणेश गितेंचा अर्ज दाखल, शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता, निवडणुकीत रंगत
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, भाजपचे गणेश गिते यांनी शनिवारी पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने युतीमधील तणाव वाढला आहे. शिंदे गटाकडून विजय करंजकर आणि ठाकरे गटाकडून माजी आमदार अनिल कदम यांनीही अर्जांची खरेदी केल्याने निवडणुकीतील रंगत शिगेला पोहोचली…