महापालिका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ, ९ जणांवर गुन्हा:खंडणी मागितल्याचा आरोप; अॅट्रोसिटी कायद्यान्वये कारवाई
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून त्रास दिल्याप्रकरणी आणि खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली नऊ जणांविरुद्ध अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मार्च २०२६ रोजी पुणे महापालिकेच्या आवारात घडली. विभागीय अतिक्रमण अधिकाऱ्यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ऋषिकेश अभिमान सावंत, सुनिल जयवंतराव पवार, उमेर मैनुद्दीन शेख,…